कोल्हापूर : बिंदू चौकातून अनुमती न घेता दुचाकीची फेरी आयोजित करणारे ‘एम्आयएम्’ पक्षाचे शहराध्यक्ष शाहीद शेख यांना ६ फेब्रुवारीला पोलिसांनी कह्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
१. शाहीद शेख यांनी औरवाड (तालुका शिरोळ) येथील पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार मुल्ला यांचे आवेदन प्रविष्ट करण्यासाठी फेरीचे आयोजन केले होते; मात्र यासाठी त्यांनी पोलिसांची अनुमती घेतली नव्हती. (पोलीस प्रशासनाचे नियम पायदळी तुडवणारे ‘एम्आयएम्’पक्षाचेे शहराध्यक्ष ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. फेरी बिंदू चौकातून निघणार होती. फेरीला मुसलमान समाजातील कार्यकर्त्यांनीच विरोध केल्यामुळे बिंदू चौकात सकाळी १ घंटा तणाव होता.
३. पोलिसांनी शेख यांना कह्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. या वेळी महापौर हसीना फरास यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
४. माजी नगरसेवक आदिल फरास, शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान, जयकुमार शिंदे यांसह ५०-६० कार्यकर्ते बिंदू चौकात जमले होते. एम्आयएम्चे कोणी दिसल्यास ठोकून काढू, अशीच भूमिका त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली. (पोलिसांसमोर कायदा हातात घेण्याची भाषा करणारे धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात