Menu Close

पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या अमेरिकन उद्योगपतीला मुंबईत अटक

विजय नंदा

मुंबई : पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्याला इसमाला महसूल गुप्तवार्ता संचलनायलाच्या पथकाने मुंबईतून अटक केली. विजय नंदा असे या आरोपीचे नाव आहे.

पहिल्या शतकातील टेराकोटाच्या मूर्ती, १७ व्या शतकातील महिषासुरमर्दिनी, गणपतीच्या कांस्य मूर्ती, १० शतकातील दक्षिण भारतातून आणलेल्या वरदा गणेश, पद्मपाणी, विष्णू यासह अनेक मूर्ती विजयच्या घरातून जप्त करण्यात आल्या आहेत.

विजय नंदा अमेरिकेत उद्योगपती असून तो मूळचा भारतीय आहे. अटकेनंतर त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

स्थानिक गुंडांच्या मदतीने या मूर्ती चोरून त्यांची बनावट कागदपत्र हे तस्कर बनवतात. यानंतर पुरातत्त्व विभागाचे प्रमाणपत्र घेऊन याची परदेशात तस्करी होते. यापूर्वी नंदाच्या एका साथीदाराला चैन्नईतून अटक करण्यात आली होती.

संदर्भ : एबीपी माझा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *