बांबवडे (जिल्हा कोल्हापूर) : विश्वामध्ये सुराज्य येण्यासाठी सर्वांचे लक्ष भारताकडे लागले आहे; मात्र भारतातील निधर्मी आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहेत. देव, देश आणि धर्म या त्रिसूूत्रीवर आम्ही चालतो. संप्रदाय कुठलाही असो, मूळ सनातन वैदिक हिंदु धर्म आणि वेद मानणे, हे आमचे सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. रामराज्य आपल्या सर्वांसाठी आहे. आम्हाला कोणतेही वैभव नको, आम्हाला केवळ हिंदु राष्ट्रच हवे. विश्वामध्ये सुराज्य येण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी प्राणत्यागाचीही सिद्धता ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले (पुणे) यांनी येथे केले. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर (सिंधुदुर्ग) आणि रणरागिणीच्या सौ. रूपा महाडिक (सातारा) उपस्थित होते.