Menu Close

भिवंडीत धर्मांध रिक्शाचालकांच्या मारहाणीत हिंदु बसचालकाचा मृत्यू

भिवंडी पाकमध्ये आहे कि भारतात ? धर्मांधांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काय करणार आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

भिवंडी : धर्मांध रिक्शाचालकांनी केलेल्या मारहाणीत येथील एका हिंदु बसचालकाचा मृत्यू झाला आहे. रिक्शाचालकांच्या उद्दामपणामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

१. बसचालक रात्री आगारात बस नेत होते. तेव्हा प्रवेशद्वाराजवळ रिक्शा उभी होती. बसचालकाने रिक्शाचालकाला सांगूनही त्याने रिक्शा बाजूला घेतली नाही.

२. बसचालक बस आत नेत असतांना रिक्शाला बसचा धक्का लागला. तेव्हा धर्मांध रिक्शाचालकाने संतप्त होऊन बसचालकाला जाब विचारला. दोघांमध्ये वाद चालू असतांना आजूबाजूच्या धर्मांध रिक्शाचालकांनी येऊन हिंदु बसचालकाला मारहाण केली.

३. घटनेची तक्रार करण्यासाठी बसचालक पोलीस ठाण्यात गेले; मात्र ते तेथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले; पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत बसचालकांनी संप पुकारला आहे. (संप करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा संघटित होऊन सरकारकडे धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. येथे अनेक वेळा रिक्शाचालक वेड्यावाकड्या पद्धतीने वाहने उभी करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवाशांकडून ते २० रुपयांच्या ऐवजी ३० रुपये घेत आहेत, असेही काहींनी सांगितले. (प्रवाशांना वेठीस धरणार्‍या अशा धर्मांधांवर प्रशासन काय कारवाई करणार ? -संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्मांधांची बाजू घेण्याची पोलिसांची मानसिकता !

पोलीस या प्रकरणी पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. पोलिसांनी धर्मांधाचे नाव सांगण्यासही नकार दिला. (यावरून पोलिसांवर धर्मांधांचा दबाव आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? अशी स्थिती असेल, तर हिंदूंना न्याय कसा मिळणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *