Menu Close

‘व्हॅलेंटाइन डे’ला आई-वडिलांची पूजा करा : जिल्हाधिका-यांची नोटीस

नवी देहली : ‘व्हॅलेंटाइन डे’ या दिवशी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश येथील जिल्हाधिका-यांनी दिले आहे.

छिंदवाडा जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी एक नोटीस जारी केली असून यामध्ये युवकांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याऐवजी त्या दिवशी आई-वडिलांची पूजा करा, असे म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व शालेय आणि सामाजिक संस्थांमधून १४ फेब्रुवारी आई-वडिलांच्या पूजेचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. तसेच, घर, गाव आणि शहरांमधून या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, असेही म्हटले आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *