बेळगाव : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अध्यादेश काढून पाठवून देण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती जिल्हाधिकार्यांना देऊन त्याविषयी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिरस्तेदार एफ्.ए. फैजी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो; मात्र त्याचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्लास्टिक ध्वजांवर बंदी घालण्यासाठी त्वरित पाऊल उचलावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांची आश्वासक विधाने
या वेळी उपशिक्षणाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान न होण्याविषयी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अध्यादेश काढून पाठवून देण्यात येईल.
पोलीस आयुक्त सौमेंदु मुखर्जी म्हणाले की, पोलीस खात्यातील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणार्या जवळजवळ १ सहस्र कुटुंबियांना राष्ट्रध्वज आणि राष्ट्रचिन्ह यांचा गौरव वाढवण्यासाठी आजपासूनच उपक्रम राबवण्यात येईल. हा प्रारंभ आमच्यापासूनच होऊ दे. याविषयी आणखी काय करणे शक्य आहे, ते आम्ही करू.
पोलीस अधीक्षक रविकांत गौडा म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती चांगले काम करत आहे. मी आमच्या सर्व पोलीस ठाण्यांमधून पोलीस अधिकार्यांना काळजी घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जागृती करायला सांगतो.
उपस्थित हिंदुत्ववादी…
धर्माभिमानी सर्वश्री विलास महागांवकर, सदानंद मासेकर, गोपीनाथ महागांवकर, दशरथ पालेकर, कर्तव्य महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. आक्काताई सुतार आणि महिला सदस्य, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री गिरीश कुलकर्णी, सुधीर हेरेकर, सनातन संस्थेच्या सौ. अर्चना लिमये, श्री. बापू सावंत आदी धर्माभिमानी निवेदन देतांना उपस्थित होते.