Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून आंध्रप्रदेशमधील ‘देवुडु’ या चित्रपटातील भगवान शिव आणि श्री बालाजी यांच्या विडंबनाच्या विरोधात जागृती

हिंदु जनजागृती समितीचा आंध्रप्रदेश मधील प्रसारकार्याचा आढावा !

१. तेलुगू भाषेतील ‘देवुडु’ या आगामी चित्रपटातून करण्यात आलेल्या भगवान शिव आणि श्री बालाजी यांच्या विडंबनाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने आंध्रप्रदेशमधील काचीगुडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करणे अन् पोलीस आयुक्तांना निवेदन देणे

‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक आयोजित केली. समितीने काचीगुडा पोलीस ठाण्यात या विडंबनाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या वेळी जगद्गुुरु श्री नरेंद्र महाराज यांच्या श्री संप्रदायातील साधक, अधिवक्ता गंगाधर गौड आणि शिवशक्ती या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस आयुक्तांना याविषयीचे निवेदन देतांना भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर आणि विश्‍व हिंदु एकता मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.’

२. १ जानेवारी हा नववर्षारंभदिन साजरा करण्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने आंध्रप्रदेशमध्ये राबवलेली प्रबोधनात्मक मोहीम !

२ अ. ‘केके ६’ या वाहिनीवर समितीचे श्री. नेला तुकाराम यांनी १ जानेवारी या दिवशी काढण्यात येणार्‍या रांगोळीत ‘हॅपी न्यू इयर, वेलकम न्यू इयर’, असे लिहिण्याच्या विरोधात प्रबोधन करणे

‘तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ख्रिस्ती नववर्ष १ जानेवारीच्या दिवशी घरासमोर रांगोळी काढून त्यात ‘हॅपी न्यू इयर, वेलकम न्यू इयर’, असे लिहिण्याची कुप्रथा रूढ झाली आहे. याविषयी समितीच्या वतीने हिंदूंचे प्रबोधन करण्यात आले. ‘केके ६’ या वाहिनीवर १ जानेवारी या दिवशी घरोघरी काढण्यात येणार्‍या रांगोळ्यांमधून ‘हॅपी न्यू इयर, वेलकम न्यू इयर’ असे लिहिण्याच्या विरोधात प्रबोधन म्हणून ३१ डिसेंबर या दिवशी पूर्ण दिवसभर तळपट्टी दाखवण्यात आली. समितीच्या वतीने श्री. नेला तुकाराम यांनी प्रबोधन केले.

२ आ. प्रवचने : ३१ डिसेंबरनिमित्त होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात प्रबोधन करण्यासाठी भाग्यनगर येथे महिलांसाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

२ इ. सामाजिक संकेतस्थळांवर प्रबोधनात्मक अभियान राबवणे

१ जानेवारी या दिवशी अयोग्य रितीने काढण्यात येणार्‍या रांगोळ्या आणि त्या दिवशी मंदिरांमध्ये केल्या जाणार्‍या विशेष पूजा-अर्चेच्या अशास्त्रीय पद्धतीच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळांवर प्रबोधनात्मक अभियान राबवण्यात आले.’

– श्री. चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश

सनातन संस्थेच्या वतीने आंध्रप्रदेशातील इंदूर आणि भाग्यनगर येथे वैकुंठ एकादशीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

‘८.१.२०१७ या दिवशी वैकुंठ एकादशीनिमित्त येथील बालाजी मंदिरात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इंदूर येथे २ आणि भाग्यनगर येथे २ ग्रंथप्रदर्शने लावली होती.’

– सौ. मीना कदम, आंध्रप्रदेश

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *