‘रणरागिणी’ शाखेच्या प्रयत्नांना यश ! या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
पणजी : पर्वरी येथील मॉल-द-गोवाच्या दर्शनी भागात ‘काल्वीन क्लीन जीन्स’चे अश्लील चित्र असलेला विज्ञापनफलक मॉलच्या व्यवस्थापकांनी हटवला. हा विज्ञापनफलक हटवण्याची मागणी ‘रणरागिणी’ शाखेच्या एका शिष्टमंडळाने मॉलचे संचालक भुवन शेट यांच्याकडे ३ जानेवारी या दिवशी केली होती.
मॉलचे संचालक भुवन शेट यांनी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकल्यानंतर ‘काल्वीन क्लीन जीन्स’ आस्थापनाच्या अधिकार्यांशी चर्चा करून विज्ञापनफलक हटवणार असल्याचे आश्वासन दिले होते. (महिलांचे म्हणणे ऐकून अश्लील विज्ञापनफलक हटवणारे मॉल-द-गोवाचे संचालक भुवन शेट यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) संचालक शेट यांची ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मळीक यांनी भेट घेतली होती. गोवा ही परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे; मात्र अश्लील विज्ञापनांमुळे येथील वातावरण दूषित केले जात आहे. पुण्यभूमीला भोगभूमी बनवण्याचा हा कट आहे. महिलावर्गाच्या भावना या अश्लील विज्ञापनामुळे दुखावल्या गेल्या आहेत, असे रणरागिणी शाखेने दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात