Menu Close

सातारा येथील जामा मशिदीचे मुख्य विश्‍वस्त तीन जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार

हिंदु मंदिराचे विश्‍वस्त आणि पुजारी यांवर कारवाई झाल्यावर डंका पिटणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सातारा : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड या गावातील जामा मशिदीचे मुख्य विश्‍वस्त सरफराज सय्यद यांना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार केले आहे. (अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मशिद व्यवस्थापनाच्या अंतर्गत कलहामुळे गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. त्यातच सय्यद यांनी मुसलमान समाजातील काही लोकांना लक्ष्य करत गुन्हे प्रविष्ट करण्याचा सपाटा लावला होता. सय्यद यांच्या विरोधातही पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे प्रविष्ट होते. गावात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी प्रांताधिकारी खराडे यांच्याकडे सय्यद यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *