जयसिंगपूर येथे निवासी नायब तहसीलदारांना निवेदन
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) : येथे १८ जानेवारी या दिवशी निवासी नायब तहसीलदार श्री. वैभव पिलारे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे जयसिंगपूर येथील अध्यक्ष श्री. विजय धंगेकर, भाजप जिल्हा चिटणीस श्री. पोपट पुजारी (शिरोळ), दैनिक महान कार्यचे पत्रकार श्री. सुनील क्षीरसागर, शिवसेनेचे श्री. सूरज भोसले आणि श्री. अरुण लाटवडे, हिंदु धर्माभिमाभिमानी श्री. संजय वैद्य यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
सिंहगड रस्ता, राजगुरुनगर आणि मंचर (जिल्हा पुणे) येथे पोलिसांना निवेदन सादर
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस-प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथील सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, खेड पोलीस ठाणे आणि मंचर पोलीस ठाणे (जिल्हा पुणे) या ठिकाणी निवेदन देण्यात आली.
सिंहगड रस्ता
१६ जानेवारी या दिवशी सिंहगड रस्ता पोलीस ठाणे येथे हे निवेदन राजाराम ननावरे यांनी स्वीकारले. ते म्हणाले की, रस्त्यावरील छोट्या ध्वजांची विक्री कशी बंद होईल, यासाठी आम्ही प्रयत्न आणि सहकार्य करू. हे निवेदन देण्यासाठी समितीचे शशांक सोनवणे, धर्माभिमानी सौरभ बाबर आणि अन्य राष्ट्रप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजगुरुनगर (जिल्हा पुणे)
राजगुरुनगर येथील खेड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना १० जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी तिन्हेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास पाचारणे, शिवभक्ती प्रतिष्ठानचे श्री. स्वप्नील ढोरे, हिंदु धर्माभिमानी श्री. लवू राक्षे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दिलीप मांदळे, राजेंद्र गोडबोले, विनायक नाईकरे आणि दिलीप शेटे आदी उपस्थित होते.
मंचर (जिल्हा पुणे)
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांनाही वरील आशयाचे निवेदन १० जानेवारी या दिवशी देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रा. राजाराम बाणखेले, शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्री. संतोष बाणखेले, शिवसेनेचे माजी मंचर शहरप्रमुख श्री. कल्पेश (आप्पा) बाणखेले, भाजपचे श्री. बाबू थोरात आणि हिंदु धर्माभिमानी श्री. वसंतशेठ बाणखेले, श्री. संदीप बाणखेले, समितीचे सर्वश्री राजेंद्र महाजन, विठ्ठल वायकर, गणेश काजळे, स्वप्नील बाणखेले, दिलीप शेटे आदी उपस्थित होते.
बारामती (जिल्हा पुणे) येथेही निवेदन
बारामती (जिल्हा पुणे) : येथेही तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. सुधा घाटगे, सौ. इटनाळ, सौ. डफळ, सौ. बुरुडे, श्री. दिनेश नायक उपस्थित होते. या वेळी त्यांनी निवेदनाच्या संदर्भात पुढे कळवणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
कराड येथे नायब तहसीलदार यांना निवेदन सादर
सातारा : येथील नायब तहसीलदार श्री. गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संभाजी जगताप, चिंतामण पारखे, लक्ष्मण पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. नागेश कुलकर्णी, धर्माभिमानी श्री. किशोर पवार, श्री. उत्तम पवार, सनातन संस्थेच्या सौ. नीला देसाई आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.