Menu Close

धर्मप्रथा तोडण्याच्या आणि हिंदूंवरील अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आझाद मैदानात १८ हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या !
शनिशिंगणापूरची धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडवर कठोर कारवाई करा !
विस्थापित काश्मिरी हिंदूंना केंद्रशासित पनून कश्मीर द्या !
मालदा (बंगाल) येथील दंगलीचे न्यायिक अन्वेषण करा !

andolan_mumbai

मुंबई : २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथा मोडण्यासाठी जाणार असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर पूर्वीच कायदेशीर कारवाई करून हिंदूंच्या धार्मिक भावना जपाव्यात, काश्मीरमधून विस्थापित झालेल्या साडेचार लाखांहून अधिक हिंदूंच्या पुनर्वसनासाठी पनून कश्मीर नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी, तसेच मालदा (बंगाल) येथे अडीच लाख धर्मांधांनी केलेल्या जातीय हिंसाचाराचे न्यायिक अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी आदी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात १९ जानेवारी या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. १८ हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदुत्ववाद्यांच्या वरील मागण्यांसाठी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनांवर शेकडो नागरिकांनी या वेळी स्वाक्षर्‍या केल्या. उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात हिंदूंना कृतीशील संघटन करण्याचे आवाहन केले. या आंदोलनास २७५ हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते.
१. श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना केवळ प्रसिद्धीसाठी धार्मिक प्रथा तोडू पहाणार्‍या तथाकथित पुरोगामी भूमाता ब्रिगेड या संघटनेला पोलीस प्रशासनाने प्रतिबंध करून हिंदु परंपरा आणि धर्म यांचे रक्षण करावे, अशी मागणी येथे मोठ्या संख्येने जमलेल्या महिला आंदोलकांनी केली.
२. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला १९ जानेवारीला २५ वर्षे पूर्ण झाली. अजून त्यांचे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. काश्मिरी हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणाचे न्यायिक आयोगाद्वारे सखोल अन्वेषण करण्यात येऊन या अत्याचाराला वंशसंहार म्हणून ओळखले जावे, तसेच विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन केलेल्या पनून कश्मीर प्रदेशास ३७० वे कलम लागू नसावे, काश्मीरमधील हिंदूंची मंदिरे आणि भूमी यांचे सर्वेक्षण करून त्यांना संरक्षित करावे. तेथे तीर्थयात्रा काढण्यास मुभा द्यावी आदी मागण्या या आंदोलनाद्वारे केंद्रशासनाकडे करण्यात आल्या.

३. पश्चिम  बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे ३ जानेवारी या दिवशी अडीच लाख धर्मांधांनी हिंसक मोर्चा काढून शासकीय आणि खाजगी संपत्तीची मोठी हानी केली. गोळीबार करणे, बस पेटवणे, पोलीस ठाणे, तसेच पोलीस आणि सीमा सुरक्षा दल यांची २४ वाहने जाळणे, बॉम्बस्फोट करणे आदी गंभीर हिंसक प्रकार करणार्‍या धर्मांधांवर कारवाई न करता पाठीशी घालून शासन पीडित हिंदूंवर अन्याय करत आहे. त्यामुळे बंगालमधील कायदाद्रोही शासन विसर्जित (बरखास्त) करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही या आंदोलनद्वारे करण्यात आली. धर्मप्रथा तोडण्याच्या आणि हिंदूंवरील अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

१८ संघटनांसह शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग !

यूथ फॉर पनून कश्मीर, काश्मिरी हिंदु समुदाय, भारतीय नारी शक्ति, बजरंग दल, हिंदुराष्ट्र सेना, हिंदु महासभा, हिंदु गोवंश रक्षा समिती, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, मातृभूमी प्रतिष्ठान, भारत विकास मंच, युवा सेना, हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच शिवसेना आणि भाजप हे पक्ष

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *