विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीच्या बैठकीतील निर्णय
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथे ९ फेब्रुवारी या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पंढरपूर येथील देवस्थान समितीच्या गैरकाराभाराविरुद्ध आगामी काळात आंदोलन करण्याविषयीचे आणि मंदिराचे पावित्र्य जपण्याविषयीचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे गोशाळेतील गायींचा मृत्यू झाला होता. या संदर्भात आचारसंहिता संपताच जनआंदोलन करण्याचे कृती समितीने निश्चित केले आहे. या बैठकीस कृती समितीतील सदस्य श्री. गणेश लंके, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर, अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर, वारकरी पाईक संघाचे प्रवक्ता ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, सर्वश्री प्रताप साळुंखे, सौरभ थिटे, वैभव बडवे आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात