नल्लगोंडा (तेलंगण) येथे हिंदु धर्मजागृती सभा
भाग्यनगर (तेलंगण) : धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर स्वत: अवतार घेणार आहे. ‘आमचा धर्म कोणी नष्ट करू शकत नाही, असे हिंदूंना वाटते. हे खरे की, कृष्ण येईल; पण त्यासाठी अर्जुनाची आवश्यकता आहे. अर्जुन बनवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन श्री. रामकृष्ण वेदांतम् यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नल्लगोंडा येथील टी.टी.डी. कल्याण मंडपात झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. विनुता शेट्टी यांनी संबोधित केले. या सभेला ३७५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
सभेत श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘भाग्यनगर येथील शासकीय भूमी इस्लामिक संशोधन केंद्रासाठी देण्याचे तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. अशा प्रकारे होणारे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.’’
सौ. विनुता शेट्टी म्हणाल्या, ‘‘आज सर्वच क्षेत्रांत महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार वाढत आहेत; परंतु याकडे प्रशासन किंवा सुरक्षायंत्रणा यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःचे रक्षण स्वत: करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. नल्लगोंडामध्ये आतापर्यंत अनेक कार्यक्रम झाले आहे; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच लोक उपस्थित राहिले नव्हते. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विशेषत: महिला हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित होत्या. श्री. रामकृष्ण वेदान्तम् यांनीही सभेला लक्षणीय उपस्थिती असल्याचे सांगितले.
२. या सभेनंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत एक धर्माभिमानी म्हणाले, ‘‘नल्लगोंडामध्ये वर्ष १९६४ मध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. त्याप्रमाणे आजही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात ईश्वराने हिंदु जनजागृती समितीला इथे पाठवले आहे. आमचा हिंदु जनजागृती समितीला पाठिंबा आहे.’’
३. नल्लगोंडामध्ये यापुढे हिंदुत्वाच्या संदर्भात काही कार्य होईल, तर ते केवळ हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातूनच होईल, असे काही हिंदुत्वनिष्ठ म्हणाले.
४. २ स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सभेचे चित्रीकरण केले आणि दुसर्या दिवशी प्रसारण केले.
५. ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून नियोजनकौशल्य, प्रसार करणे आणि चुकांचा अभ्यास करणे, हे शिकण्यासाठी आमच्याकडील १० युवकांना त्यांच्याकडे पाठवायला हवे’, असे नल्लगोंडातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात