हिंदु जनजागृती समितीची उज्जैन येथे संस्कृतीरक्षण चळवळ
उज्जैन (मध्यप्रदेश) : भारतीय युवकांकडून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची पाश्चात्त्यांची चुकीची परंपरा चालू आहे. यानिमित्ताने एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडणार्या अयोग्य प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक नेमण्यात यावे, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवून महिलांची मुलींची करणार्या युवकांना अटक करावी, मद्य पिऊन वेगाने वाहन चालवणार्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे, तसेच समितीचे सर्वश्री हेमंत जुवेकर, आनंद जाखोटिया आणि दिवाकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
उज्जैन येथे महाविद्यालयांमध्ये संपर्क मोहीम
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उज्जैन येथील ‘लोकमान्य टिळक सेवा समिती’चे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव आणि ‘फ्युचर व्हिजन’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनीष झाला यांना निवेदन देऊन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या अपप्रकाराविषयी अवगत करण्यात आले. या वेळी त्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात