Menu Close

पाकिस्तानी सेनेकडून काश्मीरमधील दगडफेक आतंकवाद करणार्‍यांचे कौतुक करणारे गाणे प्रसिद्ध !

पाकच्या या कुरापती भारत कधी रोखणार ?

श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवाद करणार्‍यांचे कौतुक करणारे गाणे प्रसिद्ध केले आहे. ‘संगबाज’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. पाक सैन्याच्या ‘इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स’ या पाकिस्तानी सैन्याच्या विभागाकडून हे गाणे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आले आहे. गाण्याच्या चित्रफीतीमध्ये काश्मीरमधील हिंसाचार आणि दगडफेक यांची दृष्ये घालण्यात आली आहेत. या गाण्याला काश्मीरमधील काही जणांनी विरोध केला आहे.

बारामुल्ला येथील पोलीस अधीक्षक इम्तियाज हुसेन यांनी ट्विट करत पाक सैन्यावर टीका करतांना म्हटले की, पाकिस्तानला वाटते की, आमची मुले काश्मीरमधील अघोषित युद्धात मरावीत.

काश्मीरमधील ज्येष्ठ पत्रकार बशीर मंजर यांनी म्हटले आहे की, पाक काश्मीरमध्ये केवळ मृतदेहांचा खच पाहू इच्छितो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *