Menu Close

पाकिस्तानमध्ये इस्लाम विरोधी व्हॅलेंटाईन डे वर बंदी

इस्लामाबाद : इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायालयात अब्दूल वहीद नामक व्यक्तीने व्हॅलेंटाईन डे विरोधात याचिका दाखल केली होती. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे चे जे प्रोमोशन केले जात आहे ते इस्लामी विचारधारेविरोधात असून त्याच्यावर तात्काळ बंदी घालावी असे याचिकेत म्हटले होते.

सोमवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली. याशिवाय छापील आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानेही व्हॅलेंटाईन डेचे प्रोमोशन करणे तात्काळ थांबवावे असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाकिस्तानमधील माध्यमांवर नियंत्रण ठेवणा-या ‘पेमरा’ने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही यावर लक्ष ठेवावे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *