महाविद्यालयांकडून उस्फूर्त प्रतिसाद, तर शिक्षणांधिका-यांनी परिपत्रक काढले !
जळगाव : शहरातील मुलजी जेठा, नूतन मराठा, बबन बाहेती, महिलांचे नंदिनीबाई बेंडाळे आणि एस्.एन्.डी.टी., रायसोनी महाविद्यालय, आय.एम्.आर्., देवकर, तसेच बांभोरी येथील अभियांत्रिकी आदी महाविद्यालयांसहित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ‘व्हॅलेटाईन डे’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून धडक प्रबोधन चळवळ राबवण्यात आली.
या वेळी वरील महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांना ‘व्हॅलेटाईन डे’ निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. महाविद्यालयात त्यासाठी परिपत्रक काढण्यात येऊन तसेच भारतीय संस्कृतीनुसार या दिवशी मातृ-पितृ दिवस साजरा करून संस्कृती रक्षणाचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना युवा पिढीचे राष्ट्रांतर आणि धर्मांतर करणारा हा दिवस साजरा न करण्याचे प्रबोधनात्मक हस्तपत्रक या वेळी देण्यात आले. उच्च माध्यमिक शिक्षणांधिका-यांनी आज जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत शासनाच्या वतीने याविषयीचे परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती दिली.
या वेळी जय भवानी ग्रूपचे श्री. येसाजी चव्हाण, सर्वश्री राहुल तळेले, मयुर भदाणे, आशिष गांगवे, योगेश ठाकुर, हर्षल, अधिवक्ता प्रितम पाटील, यश किंगरानी, कु. रागेश्री देशपांडे, श्रेयस पिसोळकर यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात