पुणे
१. येथील सिंहगड रस्ता भागातील पी. जोग. विद्यालय, छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधववर शैक्षणिक संकुल, जे. एस्. पी. एम्. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शैक्षणिक संकुल (नर्हे), जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, अभिनव महाविद्यालय, सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स अशा विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि शैक्षणिक संस्थांचे संचालक यांना भेटून निवेदने देण्यात आली. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बापू सावळे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
२. कोथरूड येथील एस्.एन्.डी.टी. महाविद्यालय, सिद्धीविनायक महाविद्यालय आणि कमिन्स महाविद्यालय येथे प्राचार्यांना भेटून निवेदने देण्यात आली.
३. अभिनव फार्मसी महाविद्यालय येथे समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड आणि परिसर
१. येथील सांगवी पोलीस ठाण्यामध्ये अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चाणखेडे यांनी उपक्रम चांगला असून काही अपप्रकार घडल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या वेळी शिववंदना गटाचे उमेश पवार, पराग ढोरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
२. भोसरी पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रूपेश कामठे, गणेश लाळे, धनंजय कचरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
३. दापोडी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे ५ वर्गांमध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांपुढे विषय मांडण्यात आला.
४. औंध येथील नृसिंह कनिष्ठ महाविद्यालय आणि पिंपरी येथील एस्.एन्.बी.पी. विधी महाविद्यालय येथे प्राचार्यांना भेटून निवेदन देण्यात आले.
५. सांगवी येथील नरसिंह कनिष्ठ महाविद्यालय, बा.रा. घोलप उच्च महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि लिटल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालय येथे निवेदने देण्यात आली.
भोर
१. येथील राजा रघुनाथ महाविद्यालय आणि शिवाजी माध्यमिक अन् उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्राचार्यांना भेटून निवेदन देण्यात आले.
२. भोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी योग वेदांत सेवा समितीचे अशोक बारीक, धर्मप्रेमी सर्वश्री तेजस मोरे, मनोज नाझीरकर, युवराज मगर, सतीश उगले आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरवळ
शिरवळ पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सुनील पवार आणि निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ. स्मिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले की, तुम्ही चांगले कार्य करत आहात. त्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा राहील. आम्ही स्वतः महाविद्यालयांमध्ये भेटी घेऊन यामध्ये लक्ष देत असतो. त्यासाठीही समिती स्थापन केली आहे. त्या दिवशी अपप्रकार करणार्यांवर आम्ही कारवाई करत असतो. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री सूरज राऊत, विशाल राऊत, अक्षय चौगुले आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. अभिनव फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. देशपांडे यांना आयुर्वेदविषयाचे ग्रंथ दाखवल्यावर त्यांनी ते घेण्याची सिद्धता दर्शवली.
२. भोर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्याच्या वेळी दैनिक सनातन प्रभातचे एक वाचक आपल्या २ मित्रांसमवेत उपस्थित होते.
यवतमाळ येथे पोलीस अधीक्षकांना निवेदन
जिल्हा पोलीस अधीक्षक राज कुमार साहेब, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल्. न. पंत आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.एन् ढोले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे मनोज औदार्य, हिंदुराज मंडळाचे मुकेश सिंह राणा, प्रजोत चौकडे, ऋषिकेश टाके, योग वेदांत सेवा समितीचे श्री. राजारामजी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात