विरार : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या, मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये मागील काही वर्षांत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे. प्रसारमाध्यमे, सामाजिक संकेतस्थळे, तसेच चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनसुद्धा या दिवसाला अनावश्यक महत्त्व दिले जात असल्यामुळे त्याचे पडसाद किशोरवयीन विद्यार्थ्यांवरसुद्धा उमटतात. परिणामी अपरिपक्व वयामध्ये मुलांमध्ये लैंगिक भावना उद्दीपीत होऊ लागली आहे. भारतीय संस्कृतीवर घाला घालणा-या या पाश्चात्त्य दिनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी विरारमधील धर्माभिमानी हिंदू सर्वश्री शिवचरण यादव, राकेश कनोजीया, दशरथ वागरी, सन्नी राजपूत, अनिकेत चव्हाण, रोशन झा आणि आशिष चौधरी यांनी एकत्र येऊन शाळांना संपर्क करण्याचा निर्णय घेतला. हिंदु जनजागृती समितीने सिद्ध केलेले ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी जागृती करणारी निवेदने त्यांनी खालील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संपर्क साधून शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिली.
उत्कर्ष विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, विरार पश्चिदम, एम्.जी.एम्. हायस्कूल, विवा महाविद्यालय, नॅशनल हायस्कूल, विद्यामंदिर शाळा, सेंट पीटर हायस्कूल, एन्.जी.व्ही. हायस्कूल, मुलजी मेहेता इंटरनॅशनल हायस्कूल, विद्याविहार हायस्कूल, आदर्श विद्यालय, शास्त्री विद्यालय, फादर एन्जल्स हायस्कूल या शाळांमध्ये हे निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात