कारंजा : विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी पनून काश्मीर द्या, शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करा, महाराष्ट्रातील भारतीय संस्कृतीविषयी खोटी, अवमानजनक माहिती देणारा एन्.सी.ई.आर.टी.च्या पाठ्यपुस्तकातील मजूकर त्वरित पालटण्यात यावा, तसेच चुकीची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १७ जानेवारी या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ह.भ.प. प्रकाशमहाराज सुपलकर यांची वंदनीय उपस्थिती होती. तरुणांचाही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी हिंदूंनी मागण्यांच्या निवेदनावर स्वाक्षर्याही केल्या.