Menu Close

थ्रिसूर (केरळ) येथे साम्यवाद्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

  • केंद्र सरकारने केरळमधील हिंदूंच्या हत्या रोखल्या नाहीत, तर अल्पावधीतच केरळ राज्यातून हिंदू नामशेष होण्यास वेळ लागणार नाही ! हिंदूंच्या वारंवार होणार्‍या हत्यांविषयी भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प का ?
  • दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाक याची हत्या, तसेच रोहित वेमुला याची आत्महत्या आदी प्रकरणांवरून असहिष्णुतेचा कांगावा करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये साम्यवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या होत असलेल्या हत्यांविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या या त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

थ्रिसूर (केरळ) : राज्यातील थ्रिसूर जिल्ह्यातील मुक्काटुकरा भागातील भाजपचे कार्यकर्ते निर्मल (वय २० वर्षे) यांची साम्यवाद्यांनी चाकूने वार करून हत्या केली. १२ फेब्रुवारीच्या रात्री येथील कोंकुलंग्रा मंदिराचा उत्सव चालू असतांना ही हत्या करण्यात आली. आक्रमणाच्या वेळी निर्मल यांच्यासमवेत असणारे अन्य एक कार्यकर्ते थॉमस हेही गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहेे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. केरळमध्ये साम्यवाद्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या मासात साम्यवाद्यांनी भाजपचे कार्यकर्ते मुलाप्राम एजुथन् संतोष (वय ५२ वर्षे) यांची त्यांच्या घरात घुसून हत्या केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *