Menu Close

भारतीय संस्कृतीवर घाला घालणा-या ‘व्हॅलेंटाईन डे’ला हद्दपार करा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

रणरागिणी शाखेच्या वतीने घाटकोपर येथे जनजागृती आंदोलन

घाटकोपर : आज तरुणांना क्रांतिकारकांच्या विचारांची आवश्यकता असतांना ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चात्त्य दिवस भारताच्या तरुण पिढीला नष्ट करू पहात आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती नष्ट करू पहाणा-या ‘व्हॅलेंटाईन डे’ नामक विदेशी षड्यंत्राला बळी न पडता भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी येथे झालेल्या जनजागृती आंदोलनात केले. या वेळी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली.

आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रप्रेमींनी मांडलेले विचार

१. कु. मृणाल भगत, महाविद्यालयीन विद्यार्थिनी : तरुणांनी आपली भारतीय संस्कृती समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे.

२. डॉ. (कु.) जागृती गुलाटी : ‘व्हॅलेंटाईन डे’ भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. आजच्या युगात तरुणांनी आपल्या हितासाठी जे आवश्यक आहे, तेच घेतले पाहिजे. उगाच भोगवादाला बळी पडू नये.

३. कु. कोमल पवार : रणरागिणीचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. रणरागिणींना पाहिल्यावर झाशीच्या राणीची आठवण येते.

क्षणचित्रे

१. ‘मुंबई लाइव्ह’ या संकेतस्थळाच्या प्रतिनिधी कु. अपर्णा यांनी सौ. नयना भगत यांची मुलाखत घेतली.
२. पोलिसांनी नियोजित वेळेच्या अगोदरच आंदोलन थांबवण्यास सांगितले. (अन्य धर्मियांचे आंदोलन थांबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. आंदोलनानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यातील अधिका-यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासंबंधी निवेदन दिले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *