Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फरिदाबाद येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन

विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. देवेंद्रजी

फरिदाबाद : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात येथील सेक्टर १६ मधील अग्रसेन चौकात नुकतीच प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक धरले होते. या वेळी समितीचे श्री. सुरेश मुंजाल यांच्यासह अनेक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.

आर्.व्ही.एम्. शाळेत व्याख्यानाचे आयोजन

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करण्याविषयी समितीचे कार्यकर्ते श्री. देवेंद्रजी यांनी खेडी कला येथील आर्.व्ही.एम्. शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याचा १५० विद्यार्थी आणि १२ शिक्षक यांनी लाभ घेतला. तसेच १४ फेबुु्रवारीला ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्याविषयी शाळेच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले.

लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाजवळही प्रबोधनात्मक पत्रकांचे वितरण

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांविषयी जनजागृती करण्यासाठी, तसेच या ‘डे’ ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्याविषयी लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाजवळ प्रबोधनात्मक पत्रकांचे वितरण करण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे लक्ष्मीनगर भागाचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद गुप्ता, श्री. हरिकिशन शर्मा, श्री. संतोष गुप्ता, सौ. राजरानी माहुर, सौ. तारा यादव, तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *