-
श्री. शिर्के आक्रमणात गंभीररित्या घायाळ
-
गोरक्षणाच्या कार्याच्या रागातून आक्रमण झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
-
धर्मांधांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी
यावरून मालेगाव येथे कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडतो ! गोरक्षकांवर जिवावर उदार होऊन करावे लागणारे गोरक्षण पहाता गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदोपत्रीच लागू केला आहे कि काय, अशी शंका येते ! – संपादक, हिंदुजागृति
मालेगाव (जिल्हा नाशिक) : १४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोरक्षा समितीचे अध्यक्ष तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर ३० ते ४० धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. विराट हिंदु संत संमेलनाच्या सिद्धतेत असतांना दुचाकीवरून येऊन धर्मांधांच्या गटाने हॉटेल सुंदरा पॅलेस येथे श्री. शिर्के यांना हॉकीस्टीकने अमानुष मारहाण केली, तसेच तेथील वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या वाहनावर श्रीरामाचे चित्र असलेले हिंदु संत संमेलनाचे फलक (ग्राफिक) लावलेले होते. अमानुष मारहाणीमुळे बेशुद्ध झालेले श्री. शिर्के यांना प्रयास रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या आक्रमणात श्री. शिर्के यांच्यासमवेत असणारे दोन कार्यकर्तेही घायाळ झाले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती.
या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती अशी की, सकाळी ११ च्या सुमाराला धर्मांधांनी श्री. शिर्के यांना लक्ष्य केले. स्थानिक नागरिक हे श्री. शिर्के यांच्या साहाय्यासाठी जाईपर्यंत धर्मांध आक्षेपार्ह घोषणाबाजी करत निघून गेले. श्री. शिर्के हे धडाडीने गोरक्षणाचे, तसेच हिंदुत्वाचे कार्य करतात. प्रत्येक आठवड्याला अनेक गोवंशांना ते हत्येपासून वाचवतात. (गोवंशियांची अवैध वाहतूक आणि त्यांच्या होत असलेल्या हत्या गोरक्षकांना दिसतात; मात्र त्या सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलीस प्रशासनाला का दिसत नाहीत ? गोवंशियांना वाचवण्यासाठी गोरक्षकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत असेल, तर पोलीस यंत्रणा काय कामाची ? – संपादक, हिंदुजागृति) याचा राग धरूनच कसायांनी धर्मांधांच्या साहाय्याने आक्रमण केले असावे, असे बोलले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात