ठाणे येथील महाविद्यालयांत निवेदने
ठाणे, घोडबंदर रोड येथील ज्ञानगंगा बी.एड्. महाविद्यालयात मुख्यध्यापिका अंजना रावत आणि मृच्छला अभियांत्रिकी महाविद्यालयात मुख्यध्यापक श्री. आर्. बावस्कर यांना व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात समितीकडून निवेदन देण्यात आले.
जळगाव येथे एका महाविद्यालयात व्हॅलेंटाईन डेविरोधी प्रबोधन मोहीम यशस्वी
जळगाव येथील एस्.एन्.डी.टी. महिला महाविद्यालयात समितीने केलेल्या प्रबोधनामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला नाही. सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
व्हॅलेंटाईन डेच्या मोहिमेत श्री योग वेदांत सेवा समितीचाही सहभाग
व्हॅलेंटाईन डेचा अपप्रकार रोखण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीद्वारे शासनाला निवेदने दिली जातात. सनातन आणि समिती यांच्या मोहिमेला श्री योग वेदांत सेवा समितीचे समर्थन नव्हे, तर सहभाग आहे, असे श्री. मानव बुद्धदेव यांनी सांगितले आहे.
नालासोपारा आणि कोपरखैरणे येथील शाळांमध्येही प्रबोधन
नालासोपारा पश्चिोम येथील सोपारा इंग्लिश स्कूल आणि कोपरखैरणे येथील महापालिका शाळा येथे प्रबोधनपर व्याख्याने घेण्यात आली. या वेळी अनुक्रमे ४५० आणि १२५ विद्यार्थी उपस्थित होते.
जोगेश्वकरी येथेही विजय क्लासेस या खाजगी शिकवणीतील इयत्ता १० वीच्या मुलांनाही मार्गदर्शन करण्यात आले. शिकवणीतील २०० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
विदर्भातही ठिकठिकाणी प्रबोधन
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथील ३६ शाळा आणि महाविद्यालये येथेही संबंधितांना निवेदने देण्यात आली. १ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. १४ फेब्रुवारीला वर्धा येथे न्यू आर्टस् कॉलेजच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात प्रबोधनात्मक कक्ष उभारण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुणे येथे उपजिल्हादंडाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन
व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, यासाठी पुण्याचे उपजिल्हादंडाधिकारी राजेंद्र मुठे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात