मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
सुरक्षेच्या नावाखाली आज श्रीफळ नेण्यास बंदी घालणारे प्रशासन उद्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदीही करायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना पूजेच्या ताटात श्रीफळ न नेताच दर्शन घ्यावे लागणार आहे. मुंबईसह जवळच्या पसिरातील गणेशभक्त दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी करत असतात. मंदिर प्रशासन आणि पोलीस यांंनी हा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरात होणार्या भाविकांच्या गर्दीचा अपलाभ घेऊन काही घातपात घडू नये; म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (अन्य पंथियांच्या धार्मिक स्थळी असे निर्बंध लादण्यात आलेले कधी ऐकले आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात