इतर राज्यांनीही यातून बोध घेणे अपेक्षित आहे !
आेंकारेश्वर (मध्यप्रदेश) : आदि शंकराचार्य यांच्याविषयी लोकांना माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आेंकारेश्वर येथे एका संस्थेची स्थापना करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर आधारित धड्याचाही शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. राज्यात चालू असलेल्या ‘नमामि देवी नर्मदे-सेवा यात्रे’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली. ते पुढे म्हणाले, ‘‘या तीर्थक्षेत्राच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी येथे ‘लाईट आणि साऊंड शो’ चालू करण्यात येईल. (तीर्थक्षेत्राचे महत्त्व पाश्चात्त्य झगमगाटापेक्षा सात्त्विक पद्धतीने सांगणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आेंकारेश्वरच्या ठिकाणी बाल शंकराचार्य त्यांचे गुरु गोविंद भगवद्पद यांना एका गुहेत भेटले आणि नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मात प्रगती केली. आदि शंकराचार्यांनी भारतात ४ मठ स्थापन केले आणि अद्वैत सिद्धांताचा देशभर प्रसार केला.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात