पुणे : संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे जपानी भाषेत भाषांतर करण्याचा प्रा. इवावो शिमा यांचा त्यांच्या निधनानंतर अपूर्ण राहिलेला प्रकल्प त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. चिहिरो कोईसा पूर्ण करत आहेत. डॉ. कोईसा यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या तत्त्वज्ञान विभागातून ‘ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर संशोधन (पी.एच्.डी.) केले असून त्या गेल्या दोन वर्षांपासून ज्ञानेश्वरीच्या अनुवादाचे काम करत आहेत. (कुठे वैदिक संस्कृती आणि आध्यात्मिक ग्रंथ यांचे महत्त्व जाणून घेणारे विदेशी जिज्ञासू, तर कुठे धर्माला अडगळ आणि अफूची गोळी समजणारे भारतातील नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वैदिक संस्कृतीच्या अभ्यासासाठी भारतात आलेल्या प्रा. शिमा यांनी वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर असा अभ्यास करायला प्रारंभ केला होता. त्या अंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांचा अभ्यास चालू केल्यानंतर ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान जपानी लोकांनाही कळावे, या उद्देशाने त्यांनी ज्ञानेश्वरीचा अनुवाद चालू केला. त्यांच्याकडून सहा अध्यायांचे भाषांतर पूर्णही झाले होते; मात्र हा प्रकल्प अपूर्ण असतांनाच प्रा. शिमा यांचे निधन झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात