Menu Close

कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन करत ८ ते १० दिवस साजऱ्या होणाऱ्या उरूसाला ४ दिवसांचीच मर्यादा

शिवसेनेचे नगरसेवक आणि शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या प्रयत्नांना यश !

पनवेल : येथे प्रतीवर्षी होणाऱ्या पीर करम अली शाह बाबांच्या उरुसाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले होते. शिवसेनेचे नगरसेवक आणि शहरप्रमुख श्री. प्रथमेश सोमण यांच्याकडून प्रतीवर्षी करण्यात येणाऱ्या पाठपुराव्यामुळे ८ ते १० दिवसांचा उरूस केवळ ४ दिवसांवरच आला आहे. तसेच त्या कालावधीत होणाऱ्या कायद्याच्या उल्लंघनालाही चाप बसला आहे. (अन्य धर्मियांचा उत्सवही कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडावा, यासाठी प्रयत्न असणारे श्री. प्रथमेश सोमण यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. पनवेल येथे ३ दिवसांचा असणारा ऊरूस हळूहळू ८ ते १० दिवसांपर्यत होऊ लागला.

२. सर्वच रस्ते परप्रांतीय-बांगलादेशी विक्रेत्यांनी व्यापून टाकले होते. याच काळात भुरट्या चोऱ्या, घरफोडी यांचेही प्रमाण वाढले. या समाजाच्या प्रचंड गर्दीमुळे तेथे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका शिरूच शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. वाहतूकही खोळंबून रहात असे. या गर्दीचा अपलाभ घेत महिलांची छेड काढण्याचे प्रकारही वाढले होते. (उत्सवाच्या काळातील वाढता उद्दामपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. प्रत्येक सण-उत्सवांच्या संदर्भात कडक नियम असतांना उरूस याला अपवाद नको, यासाठी गेल्या ४ वर्षांपासून येथील शिवसेनेचे नगरसेवक आणि शहरप्रमुख प्रथमेश सोमण हे स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी म्हणून लढत होते.

४. सोमण यांनी उरुसाला अल्प दिवस अनुमती देण्यासाठी प्रत्येक वर्षी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यासमवेत पत्रव्यवहार केला. कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून त्यांनी रस्तेही रिकामे केले. उरूसाला विरोध केल्याने शिवसैनिक आणि उरुसाच्या नावावर नफेखोरी करणार्यांमध्ये झटापटी झाल्या, वादही झाले. धार्मिक रंग देऊन प्रथमेश सोमण यांना जीवे मारण्याच्याही धमक्या आल्या. त्यांचे पद रहित होण्यासाठी काहींनी तहसीलदारांकडे तक्रारीही केल्या.

५. शेवटी गेल्या वर्षी शिवसेनेच्या प्रयत्नांना यश मिळाले. सर्व रस्ते हे प्रवाही रहातील, अशी अनुमती पोलीस आणि पालिका यांनी दिली. त्यामुळे गेल्या वर्षीपासून १० दिवसांचा उरूस केवळ ४ दिवसांवरच आला आहे.

मी शिवसेनेचा उपविभागप्रमुख म्हणून आणि एक नागरिक म्हणून शिवसेना आणि तिच्या समवेत तरुण तडफदार नेतृत्व नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांचे मनापासून आभार मानतो, असे पनवेल येथील शिवसेना उपविभागप्रमुख श्री. मंदार प्रमोद काणे यांनी म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *