अंबरनाथ येथे आंदोलन
अंबरनाथ : हिंदूंना भारतातून नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी भारतात डे सारखी विकृती चालू केली आहे. हिंदूंनी भारतातील क्रांतीकारकांना विसरून आज डे साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रवृत्त करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे पाठबळ आहे. हिंदु संस्कृतीला वाचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन केलेले आंदोलन हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. वसंतन यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते.
मान्यवरांचे मत
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ दिन साजरा करण्यास आरंभ केला – सौ. मीना गुप्ता, योग वेदांत सेवा समिती
पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे मुले कुसंस्कारी होत आहेत. कॉन्व्हेंट शाळांमधून मुलांना विकृतीकडे नेणारे डे साजरे केले जातात. मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी गुरुकुल शिक्षणपद्धती आरंभली. त्यांनी व्हॅलेंटाईन डेला विरोध करून १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ दिन साजरा करण्यास आरंभ केला.
समाजात विकृती पसरवणाऱ्या व्हॅलेंटाईन डेवर बहिष्कार घाला – डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष, भाजप, कल्याण शहर पश्चिम
युवा पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी डेची कुसंस्कृती भारतात वाढत आहे. समाजात विकृती पसरवणाऱ्या व्हॅलेंटाईन डेवर डे वर बहिष्कार घाला; कारण या काळात कुमारी मातांचे प्रमाण अधिक वाढते.
या वेळी रणरागिणीच्या सौ. सुनीता पाटील आणि समितीच्या अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनीही विचार मांडले.
क्षणचित्रे
१. भगिनी मंडळ शाळेतील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते.
२. ख्रिस्ती आणि मुसलमान स्त्रियांनी सांगितले, आम्हीही असे डे साजरे करत नाही. (हिंदूंनो, अन्य धर्मियांकडून शिका ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. एका धर्माभिमान्यांना विषय आवडल्याने त्यांनी अन्य लोकांना दूरभाष करून आंदोलनात येऊन स्वाक्षर्या करण्यास सांगितले.
४. धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची सिद्धता केली.
५. आंदोलन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गावदेवीची ओटी भरून आशीर्वाद घेण्यात आला.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात