नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि सीबीआयने रुरकी येथे पकडलेल्या चार संशयितांना येथील न्यायालयाने बुधवारी १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांनी भारतात आत्मघातकी हल्ला करण्याची योजना आखली असल्याची माहिती त्यांनी बांगलादेशात केलेल्या फोन कॉल्समुळे मिळाली आहे. शिवाय हे चौघेही आयएसआएसशी निगडित असल्याचे चौकशीतून समोर आले असून, या हल्ल्यासाठी त्यांना सीरियातून आदेश मिळाला होता. अखलाख, ओसामा, मोहमद अझीम आमि मोहमद महरोज अशी या संशयितांची नावे आहेत.
सीरियातून कसा मिळला आदेश …
ज्या युवकांना सुरक्षा यंत्रणेने अटक केली त्यांचे वय १९ ते २३ वर्षांच्या दरम्यान आहे.
इसीस ने भारतात हल्ला करण्याची योजना आखल्याचे त्यांच्या चौकशीतून उघड झाले.
हे चौघेही इसीस च्या संपर्कात असून, त्यांना या संघटनेचे हॅडलर्स व्हीओआयपी, वॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून सीरियामधून सूचना आणि आदेश देत होते.
भारतात पहिल्यांदाच इसीस चा कट उघड झाला.
या चौघांपैकी एक असलेला अखलाख हा रुरकी येथी पॉलिटेक्निक कॉलेजचा तृतीय वर्षांचा विद्यार्थी आहे.
संदर्भ : दिव्य मराठी