Menu Close

मंदिरांतील देवांनाच मालमत्ता कर भरण्यासंबधात फतेहाबाद पालिकेने काढल्या नोटीसा !

हरियाणामधील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा अजब कारभार !

हरियाणा : हरियाणामधील फतेहाबाद जिल्ह्यातल्या सर्वच मंदिरांतील देवांना मालमत्ता कर भरण्यासंबधात पालिकेने नोटीसा पाठवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या नोटीस मंदिरातील देवांच्या नावांवरच काढण्यात आल्या असून यात राहण्याचा पत्ता म्हणून मंदिराचे नाव लिहण्यात आले आहे. तसेच नोटीसमध्ये देवांकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे देवाला मालमत्ता कर भरण्याची नोटीस आल्याची ही हरियाणामधील पहिलीच घटना असल्याने त्यामुळे राज्यातील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर नागरिकांनी टीकेची झोड उठविली आहे.

या नोटीसमध्ये शहरातील संन्यास आश्रमाला २ लाख ७७ हजार रुपये तातडीने भरण्यास सांगितले आहे. तर दुर्गामाता मंदीरातील दुर्गा देवीकडे १ लाख १० हजार रुपये एवढा मालमत्ता कर बाकी असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. याशिवाय़ शहरातील बाबा रामदेव यांच्या मंदिराला १४ हजार ४६६ रुपये एवढे मालमत्ता कराचे बिल नगरपालिकेने पाठवले आहे.

एवढेच नाही तर शहरातील एका स्मशानभूमीलाही लाखो रुपयांचे मालमत्ता कराचे बील पाठवण्यात आले आहे. नगरपालिकेच्या या अजब कारभाराची चर्चा हरियाणापासून दिल्लीपर्यत पोहचली आहे.

या मंदिरांमधील संन्यास आश्रम मंदिर याची स्थापना ७८ वर्षापूर्वी झाली. पण एवढ्या वर्षात कोणत्याही सरकारने अशा प्रकारे मंदिरातील देवांना नोटीस बजावल्या नसल्याचे संन्यास, आश्रम कोणत्याही मंदिर समितीचे प्रमुख अशोक नारंग यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या नोटीसप्रकरणानंतर पालिकेवर जनता चिडली आहे. या नोटीसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी सर्व मंदिरप्रमुखांनी नगरपालिकेचे अध्यक्ष दर्शन नागपाल यांच्याकडे केली आहे. यावर नागपाल यांनी राज्यातील सरकारनेच मंदिराकडून मालमत्तघेण्यासंदर्भात सुचना केल्याने नोटीस पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

स्त्रोत : सामना

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *