दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांच्या हस्ते सन्मान
पंढरपूर : हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर यांना दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट विधीज्ञ पंढरी विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १४ फेब्रुवारी या दिवशी पंढरपूर येथील रखुमाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांनाही पंढरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराविषयी अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर म्हणाले, समाजातील अन्यायग्रस्त असलेल्या व्यक्तीकडे संवेदनशीलतेने पाहून कायदेशीर अथवा अन्य मार्गाने साहाय्य करण्याची प्रेरणा आणि संस्कार सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यामुळेच मिळाली आहे. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. यापुढेही सतत कार्यरत रहाण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ द्यावे, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात