हिंदूंनो, या यशासाठी भगवान शिवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
देहली : ‘अॅमेझॉन’ या ‘ऑनलाईन शॉपिंग’ आस्थापनाने ॐ चे चिन्ह असलेल्या चपलांची विक्री चालू केली होती. ही गोष्ट हिंदूंच्या लक्षात आल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याची माहिती दिली. त्यावर समितीने फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून हिंदूंना विरोध करण्याचे आवाहन केले. हिंदूंच्या या संघटित विरोधाचा परिणाम म्हणून अॅमेझॉनने ॐ चे चिन्ह छापलेल्या चपलांची विक्री करणे बंद केलेे, तसेच हे उत्पादन त्यांच्या संकेतस्थळावरून काढून टाकले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात