सिंध : पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका दर्ग्यामध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला असून बॉम्बस्फोटात १०० जण ठार तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सिंधमधील सेहवान भागात असलेल्या लाल शाहबाज कलंदर दर्ग्यात हा आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. दर्ग्यात धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच हल्लेखोर गोल्डन गेटने दर्ग्यात शिरला आणि त्याने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवून दिले.
दरम्यान, या आत्मघाती हल्ल्यानंतर सेहवान भागातील रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जखमींना लियाकत मेडिकल कॉम्प्लेक्स आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स