धर्मांध युवक जिहादसाठी घरदार सोडतात, तर हिंदु युवक स्वच्या शोधासाठी म्हणजेच ईश्वरप्राप्तीसाठी घरदार सोडतात ! हिंदु धर्माची महानता यातून दिसून येते !
हिमालयाकडे प्रस्थान करण्यापूर्वी ती रहात असलेल्या वसतीगृहाच्या खोलीत तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्या चिठ्ठीवरून पोलिसांना याची माहिती मिळाली. कु. वेदांतम् एल्. प्रत्युषा ही मूळ आंध्रप्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ब्रोदिपेट येथील आहे. ती आय.आय.टी.-मद्रासच्या इंजिनिअरिंग डिझाइन या विभागातील एम्एस्च्या दुसर्या वर्षात शिकत होती. तिच्या समवेतच्या विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, त्यांनी कु. प्रत्युषा हिला शेवटचे रविवार, १७ जानेवारीला सकाळी पाहिले होते. त्यानंतर काहींनी ती हरवली असल्याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी तिच्या खोलीची झडती घेतली असता त्यांना तेथे तिचे ५ पृष्ठांचे लिखाण सापडले. यातील २ पृष्ठांवरील लिखाण इंग्रजीत, तर उर्वरीत लिखाण तेलुगू भाषेतील आहे. यात लिहिल्याप्रमाणे तिची साहसी कृत्य करण्यामवेतच धर्मावर अभ्यास करण्याची इच्छा आहे. तिने तिच्या फेसबूकवरील पेजवरही तिला रामायण, महाभारत आणि भगवत्गीता या धार्मिक ग्रंथांविषयी खूप आत्मीयता आहे, असे लिहिले आहे. देव माझे रक्षण करत आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबियांना मी कधीच सापडणार नाही, असेही तिने पत्रात नमूद केले आहे.
कु. प्रत्युषा हिच्या पालकांच्या विनंतीवरून महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. (जेव्हा हिंदु तरुण-तरुणी साधनामार्गाला लागतात, तेव्हा पालक त्यांना विरोध करतात. म्हणूनच ते पालकांना विश्वासात न घेता, असा टोकाचा निर्णय घेतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते साधना करणार्या पाल्यांना असा विरोध करतात ! – संपादक)