कोल्हापूर : मालेगाव येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच गोरक्षक श्री. मच्छिंद्र गोविंद शिर्के यांच्यावर १४ फेब्रुवारी या दिवशी ३० हून अधिक धर्मांध कसायांनी प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात शिर्के गंभीररित्या घायाळ झाले. यात त्यांच्याजवळ असलेले चारचाकी वाहनही फोडण्यात आले आहे.
केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर आक्रमणांची मालिका चालू आहे. तरी या घटनेचा विहिंप, बजरंग दल तीव्र निषेध करत असून धर्मांधावर कठोर कारवाई न केल्यास विहिंप, बजरंग दल यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना देण्यात आले.
या वेळी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि सुधाकर सुतार यांसह सर्वश्री सुधीर सूर्यवंशी, प्रशांत कागले, शिरीष हुपरीकर, ऋषीकेश शेंडगे, शिवसेना, पतितपावन संघटना, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकते, पदाधिकारी उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात