पाकमध्ये एका वैयक्तिक कायद्यासाठी हिंदूंना ६६ वर्षे संघर्ष करावा लागला. यावरून तेथील अल्पसंख्य हिंदूंची अवस्था लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंचे जागतिक स्तरावर संघटन आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हिंदु विवाह विधेयक कोणताही विरोध न होता पाकच्या सिनेटमध्ये अखेर संमत झाले. हे विधेयक ४ मासांपूर्वी पाकच्या संसदेत संमत करण्यात आले होते. आता त्याचे लवकरच कायद्यात रुपांतर होणार आहे. पाकमध्ये गेल्या ६६ वर्षांपासून हिंदु धर्मातील विवाहांची नोंदणी होत नव्हती. नवा कायदा अमलात येणार असल्यामुळे विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात