Menu Close

हाफीज सईदचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची पाकिस्तानची अप्रत्यक्ष कबुली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उल दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणून तो दहशतवादी असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे.

डॉन न्यूजच्या मते, पंजाब सरकारने सईद आणि त्याचा साथीदार काझी काशिफला दहशतवाद विरोधी कायद्याच्या (एटीए) चौथ्या यादीत टाकले आहे. या यादीत अब्दुल्ला ओबैद, जाफर इकबाल, अब्दुर रहमान आबिद या तिघांची नावेही टाकण्यात आली आहेत.

३० जानेवारी २०१७ पासून हाफिज सईद नजर कैदेत आहे. २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पण २००९ साली न्यायालयाने त्याची सुटका केली होती.

पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दशतवाद विरोधी विभागाला या लोकांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चौथ्या यादीत सईद नाव समाविष्ट करणे ही गोष्ट हे सिद्ध करते की, त्याचा कोणत्या तरी दहशतवादी कारवाईशी संबंध आहे.

या यादीत नाव आल्याने सईदच्या परदेशी प्रवासावर प्रतिबंध येऊ शकतो. तसेच त्याच्या संपत्तीचीही चौकशी होऊ शकते. तसेच याचे उल्लंघन केल्यास ३ वर्ष शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.

संदर्भ : एबीपी माझा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *