जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जळगाव : मद्य-मांस यांची विक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणार्यांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा, हज यात्रेचे अनुदान रहित करा आणि केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्या हिंदु नेत्यांचा हत्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडून करण्यात यावा, अशा मागण्यांसाठी येथे महानगरपालिकेजवळ राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी एका पटलावर हिंदु नेत्याचे प्रतिकात्मक पार्थिव ठेवण्यात आले होते. ते पहाण्यासाठी तेथे पुष्कळ लोक जमले.
या वेळी श्री जय भवानी गु्रपचे येसाजी चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, श्री. आशिष गांगवे यांनी मागण्यांचे विश्लेषण केले, तर सूत्रसंचालन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. आंदोलनाला जय भवानी ग्रुप, जय मातादी ग्रुप, बजरंग दल, शिवसेना, हिंदु महासभा यांचे कार्यकर्ते यांच्यासह ६० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात