Menu Close

पाकमधील कराची शहर हे भारतविरोधी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे मुख्य केंद्र ! – आंतरराष्ट्रीय क्रायसिस ग्रूपचा (आयसीजी) दावा

पाक भारताला संपवण्यासाठी टपला असतांना त्याला नामशेष करण्यासाठी भारत शासन कशाची वाट पहात आहे ?

ब्रुसेल्स : पाकचे कराची शहर सध्या भारतविरोधी जिहादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे केद्र बनले आहे. हाफिज सईदची लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद्-दावा, मौलाना मसूद अजहरची जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांसह लष्कर-ए-झांगवी ही शियाविरोधी संघटना कराचीतील मोठमोठ्या मदरशांंच्या माध्यमातून भारतविरोधी धोकादायक जिहादी आतंकवादी निर्माण करत असून याला पाकच्या सैन्याचा पाठिंबा आहे, असा दावा येथील विचारवंतांच्या आंतरराष्ट्रीय क्रायसिस ग्रूपने (आयसीजीने) केला आहे.

१. आईसीजीच्या ‘पाकिस्तान : कराचीत पेटता अग्नी’ या शीर्षकाच्या अहवालानुसार या जिहादी संघटनांनी संपूर्ण कराची शहर त्यांच्या कह्यात घेतले आहे. या संघटनांशी पाकचे माजी सैन्याधिकारीही जोडलेले आहेत.

. प्रशिक्षित आतंकवाद्यांच्या माध्यमातून भारतातील हिंदू आणि अन्य मुसलमानेतर यांना धर्मांतरित करून नष्ट करणे, गजवा-ए-हिंद हे स्वप्न साकार करणे आणि भारतावर नियंत्रण मिळवणे, हे त्यांचे एकमेव ध्येय आहे.

३. मे २०१६ मध्ये सिंध सैन्याच्या महासंचालकांनी कराचीतील त्यांच्या दौर्‍यात प्रशासक आणि बुद्धीवादी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरंगीच्या जामिया दारुल उलूम मदरशांचे संचालक उस्मानी बंधूचाही सहभाग होता. या उस्मानी बंधूंचे आतंकवादी संघटनांशी थेट संबंध आहेत. गजवा-ए-हिंद हा पाकच्या मदरशांमधील अभ्यासक्रमांत एक महत्त्वाचा भाग आहे.

४. अशा प्रकारे पाकचे सैन्य अणि त्याची गुप्तचर संस्था आएस्आय यांच्या साहाय्याने कट्टर मुसलमान गजवा-ए-हिंदच्या माध्यमातून भारताचे संपूर्णपणे इस्लामीकरण करण्याच्या योजनेवर कार्य करत आहेत. पाकच्या सैन्याने आतंकवादी संघटनांच्या विरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे पाकचे मोठे आणि श्रीमंत शहर म्हणनू ओळखल्या जाणार्‍या कराची शहराचे जिहादी प्रेशर कुकरमध्ये रूपांतर झाले आहेत.

गजवा-ए-हिंद काय आहे ?

गजवा-ए-हिंद ही बहुतांश पाकिस्तान्यांची धारणा आहे. यानुसार महंमद पैगंबर यांनी संपूर्ण भारत उपखंडात इस्लामी झेंडा फडकवण्याची भविष्यवाणी केली आहे. गजवा-ए-हिंदच्या समर्थकांचे स्पष्ट मत आहे की, भारतात रहाणारे हिंदू आणि अन्य मुसलमानेतर यांच्या समोर एक तर इस्लामचा स्वीकार करा किंवा मरा हे केवळ दोनच पर्याय शिल्लक आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *