कुठे एवढ्याशा घटनेवरून चाैकशी करणारे ब्रिटन पाेलीस, तर कुठे राजराेसपणे ‘आयसिस’चे फलक धरून पाेलीसांवर दगडफेक करणारे, ‘पाकीस्तान झिंदाबाद’च्या घाेषणा आणि पाकचे झेेंडे फडकवणारे, बांगलादेशी घुसखाेर अशा देशद्राेही मुुसलमानांवर अश्रूधूराच्या नळकांड्या आणि रबरी गाेळ्या झाडणारे भारतीय पाेलीस !
ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं विद्यार्थ्यासह त्यांच्या घरातील सर्वांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. केवळ एका शब्दाची स्पेलिंग चुकल्यामुळं लिहिताना झालेल्या या अल्पश्या चुकीने विद्यार्थ्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण दहशतवादी नसल्याचे सिद्ध करावे लागले. झालेल्या या प्रकारामुळं विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून झाल्या प्रकाराबाबत पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे.
बीबीसीनं दिलेल्या बातमीनुसार पीडित विद्यार्थी वायव्य ब्रिटनमधील लॅंकेशायरचा रहिवाशी आहे. चौकशीचा एक भाग म्हणून पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याच्या घरातील व्यक्तीगत कॉम्प्यूटरचीही तपासणी केली.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स