परतूर : जालना जिह्यातील परतूर येथे शांततेत चालू असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधानी केलेल्या तुफानी दगडफेकीत १२ जण गंभीर जखमी झाले असून धर्मांध जमावाने शहरात तब्बल दीड तास धुमाकूळ घातला.
परतूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी मोंढा भागातून मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक पोलीस स्टेशन चौकमार्गे दशमले चौकात आली असताना चौकात असलेल्या हिरव्या झेंडय़ाला धक्का लागल्याचे निमित्त करून धर्मांधांनी धुमाकूळ घातला. शिवजयंती मिरवणुकीला अत्यल्प पोलीस बंदोबस्त असल्याने दगडफेक सुरू होताच पोलिसांचीही पळापळ झाली. या दगडफेकीनंतर धर्मांनी मोटारसायकली तोडफोड करून पेटवून दिल्या.
शिवाय एक पानटपरी, चार रिक्षा आणि एका मंडप दुकानासहीं आग लावली. रस्त्यावरील हिंदूंच्या दुकानाला लक्ष्य करीत या दुकानांवर दगडफेक करून पोलीस ठाण्यासमोरील एक हॉटेल पेटवले.
परतूर शहरात हिंदू-मुस्लिम ५० टक्के असे प्रमाण आहे. ज्या चौकात धर्मांधांनी धुडगूस घातला त्या चौकाचे नगर परिषदेने ‘मंगलशहा चौक’ असे नामकरण केले आहे. मंगलशहा चौक नामकरण झाल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर हिरवे झेंडे लावण्यात आले होते. त्या झेंडय़ाला धक्का लागल्याचे निमित्त करूनच धर्मांधांनी धुडगूस घातला.
संदर्भ : महाराष्ट्र