सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचे हिंदु जनजागृती समितीने सिद्ध केलेले फ्लेक्स प्रदर्शन !
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र आणि धर्म यांसाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे, तरच राष्ट्र सुरक्षित राहील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, जाममुनी चौक, लष्कर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जाममुनी मोर्चा समाजाचे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी पुष्कळ प्रमाणात उपस्थित होते.
जाममुनी मोर्चा समाजाचे माजी सचिव श्री. पांडुरंग म्हेत्रे म्हणाले, ‘‘महाराजांचा इतिहास चार ओळींत शिकवण्यात येत असून मोगलांच्या इतिहासाचे धडे मात्र शिकवले जात आहेत. महाराजांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीला कळण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’
जाममुनी मोर्चा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. योगेश पल्लोलू म्हणाले, ‘‘महाराजांनी पातशाह्यांचा बीमोड करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. त्यांचा आदर्श युवकांनी ठेवून तशी कृती करावी.’’
या वेळी श्री विजय म्हेत्रे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री पुरुषोत्तम कारकल, रवि गोणेे, प्रतीक पाटील, समर्थ मोटे, आकाश म्हेत्रे, अजय ढिड्डी, नरसिंग भंडारे, मल्लप्पा म्हेत्रे, जाममुनी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ म्हेत्रे, देवप्पा कुंभार, रमेश भंडारे, तायप्पा म्हेत्रे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश आवार आणि श्री. सतीश कुंचपोर उपस्थित होते.
क्षणचित्र – प्रदर्शन लावण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हून समितीच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात