Menu Close

मध्यप्रदेशमध्ये राज्यसेवा परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील धागे कापले

एखाद्या मुसलमान विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताविज अथवा धागा कापण्याचे धारिष्ट्य संबंधितांनी केले असते का ? हिंदूंवर नियमांचा बडगा उगारणारे प्रशासन हिंदुद्रोहीच होय ! मध्यप्रदेशमध्ये भाजप सत्तेवर असतांना असे प्रकार होणे, हे दुर्दैवी होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

उज्जैन : मध्यप्रदेश राज्य आणि वन सेवा आयोगाच्या प्रारंभिक परीक्षेत होणारी नक्कल (कॉपी) टाळण्यासाठी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील आणि गळ्यातील धागे कापण्यात आले, तसेच परीक्षा कक्षात बुट-मोजे, बेल्ट आणि चष्मा घालण्यासही मनाई होती. (गळ्यातील अथवा हातातील धागे या गोष्टी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी निगडित आहेत. त्यामुळे अशी कृती करतांना प्रशासनाने याचा विचार केला होता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नियमांच्या नावाखाली काही परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात आली. (अशी सक्ती अन्य धर्मीय विद्यार्थ्यांवर केली असती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

विद्यार्थिनींच्या हातातील धागे कापण्यासाठी पुरूष कर्मचार्‍यांची नियुक्ती

राज्य सेवा आयोगाच्या प्रारंभिक परीक्षेत होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी आयोगाकडून काही कडक निर्बंध घालण्यात आले होेते, असे सांगण्यात आले. (कॉपी टाळण्यासाठी कठोर निर्बंध घालणे योग्यच; मात्र हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा उपचार भयंकर होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) देवासगेट येथील माधव कला आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थिंनींची तपासणी करण्यासाठी पुरुष कर्मचार्‍यांची नेमणूक केली होती. (अशी अक्षम्य चूक करणार्‍या संबंधितांवर कारवाई करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे तेथे आलेल्या विद्यार्थींनींना अडचण निर्माण झाली.

प्राचार्यांकडून संबंधित कृतीचे अश्‍लाघ्य समर्थन !

याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मक्कड यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘केंद्रावर महिला प्राध्यापक आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली होती; परंतु विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने असा प्रकार झाला असेल. (दायित्वशून्य विधान करणारे प्राचार्य ! विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती, हे आधी लक्षात आले नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या परीक्षाकेंद्रावर दीड मासांपूर्वी मध्यप्रदेश वैद्यकीय पूर्वपरिक्षेच्या वेळी नक्कल झाल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आलेल्या ४ प्राध्यापकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. (एकीकडे नक्कल रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करत असल्याचे दाखवायचे आणि दुसर्‍या बाजूने ज्या प्राध्यापकांवर नक्कल करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे, त्यांनाच नियुक्त करायचे, हे संतापजनक होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *