नवी देहली/बगदाद : यहुदी महिलांना वाईट वागणूक देणारे आयएसआयएस चे दहशतवादी सुन्नी अरबी महिलांचा बलात्कार करण्याबरोबरच त्यांना टॉर्चरही करतात. ह्यूमन राइट्स वॉचने हे मत मांडलेले आहे. वाचडॉगसमोर इस्लामिक स्टेटद्वारे हवाजामध्ये सुन्नी अरबी महिलांना बळजबरीने ताब्यात ठेवणे, मारहाण करणे, बळजबरीने विवाह, बलात्कार अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हवाजावर अजूनही आयएस चे नियंत्रण आहे. तो इराकच्या किरकूक प्रांतातील एक जिल्हा आहे.
२६ वर्षांच्या हनानची कथा आली समोर
न्यूज एजन्सीच्या मते हवाजामध्ये गव्हर्नमेंट फोर्सेस आणि इस्लामिक स्टेटच्या जिहादींमध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. ह्यूमन राइट्स वॉच ने २६ वर्षांच्या हनानच्या कहाणीचे उदाहरण देत सांगितले की, तिचा नवरा अचानक हवाजामधून गायब झाला होता. हनानसह इतर महिला जेव्हा शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी आयएस च्या दहशतवाद्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आयएस च्या दहशतवाद्यांनी हनानला सांगितले की, तिचा पती पळून गेल्याने ती पतित झाली असून तिने आता एखाद्या स्थानिक जिहादीबरोबर निकाह करायला हवा. हवाजामधून पळून जाणाऱ्या इराकी कुटुंबांना शहरापासून २५ किमी अंतरावर हलवण्यात आले आहे.
चिमुरड्यांसमोर रोज बलात्कार
हनानने जेव्हा या प्रस्तावाला नकार दिला तेव्हा तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून प्लास्टीकच्या केबल्सने तिला मारहाण करण्यात आली. हनानचे हात मागे बांधण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हनानने ह्यूमन राइट्स वॉच ला सांगितले की, एकाच व्यक्तीने रोज तिच्यावर बलात्कार केला. एका महिन्यांनी तिच्या डोळ्यांवरील पट्टी खोलण्यात आली. त्यानंतर तिच्या मुलांसमोरही तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
ह्यूमन राइट्स वॉच चे मत . . .
वाचडॉगच्या मते, या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलेलेच नाही. ज्याप्रकारे हा मुद्दा हाताळण्यात आला, त्यावरही कलंक लागला. त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर समोर येत नाहीत. ह्यूमन राइट्स वॉच च्या डेप्युटी मिडल ईस्ट डायरेक्टर लामा फॅकियाह म्हणाल्या, आयएसआयएस च्या काळात सुन्नी अरबी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. या सर्व पीडितांना पाठिंबा देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय कम्युनिटी आणि लोकल अथॉरिटीज यांच्यासाठी जे काही करू शकतात ते करण्याचा प्रयत्न करतात.
स्त्रोत : दिव्य मराठी