जगात मुसलमानांच्या विरोधात जरा जरी ‘खट्’ झाले, तरी थयथयाट करणा-या जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील हिंदु युवतींवर होणा-या या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, हे लक्षात घ्या !
लाहोर : पाकिस्तानात प्रत्येक वर्षी १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण करून बळजोरीने धर्मांतर केले जाते, अशी माहिती ‘पाकिस्तानी हिंदु कौन्सिल’ या संस्थेने दिली आहे. पाकिस्तानातून धार्मिक अत्याचारांना कंटाळून प्रत्येक वर्षी भारतात शरण येणा-या हिंदूंची संख्या ५ सहस्रावर पोचली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांताने एक कायदा पारित करून १८ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या व्यक्तीच्या धर्मांतरास अवैध ठरवून त्याचे पालन न करणार्यास ५ वर्षे कारावासाची शिक्षा देण्याचे प्रावधान केले आहे; मात्र या कायद्याची कार्यवाहीच होत नसल्याचे आढळून आले आहे. (केंद्रशासन याविषयी आवाज उठवणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘इस्लामच्या विरोधातील हा कायदा लागू झाला, तर शांत बसणार नाही’, अशी धमकी हाफीज सईद या आतंकवाद्याने दिली आहे. या कायद्यास अन्य कट्टरतावादी मुसलमानांनी तीव्र विरोध केला आहे. ‘मुसलमानेतरांना कुठल्याही गोष्टीत संरक्षण देणे, इस्लाम धर्माच्या विरुद्ध आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. सिंध प्रांताच्या राज्यपालांनी हा कायदा फेटाळून लावल्याने हिंदु मुलींच्या संरक्षणाची उरली-सुरली आशाही संपुष्टात आली आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात