Menu Close

वन्दे मातरम् न म्हणणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर पावलेे उचलणे आवश्यक ! – श्री. प्रमोद मुतालिक

भटकळ (कर्नाटक ) येथे हिंदु धर्मजागृती सभेस उत्तम प्रतिसाद

BTK-Upastiti-1

भटकळ : मुसलमान वन्दे मातरम् म्हणत नाहीत. त्यामुळे शासनाने अशांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. केंद्रशासन राममंदिर बांधील, गोहत्या रोखील, तसेच पाकला धडा शिकवील, असे सर्व हिंदूंना वाटले होते; परंतु हे करण्यात शासन अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री तरुमाल व्यंकटरमण सभागृहात हिंदु धर्मजागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद आणि सनातन संस्थेच्या डॉ. गौरी आचार्य या उपस्थित होत्या.

सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल ! – डॉ. गौरी आचार्य, सनातन संस्था

सनातन संस्था संपूर्ण भारतभर धर्मप्रसाराचे कार्य करते. संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आज सहस्रावधी साधक साधना करत आहेत. आतापर्यंत सनातनच्या ५६ साधकांनी साधना करून संतपद गाठले आहे; मात्र सध्या काही पुरो(अधो)गामी मंडळी हिंदुत्वनिष्ठ सनातनवर बंदी घातली जावी, यासाठी उतावीळ आहेत. सनातनचे कार्याला ईश्‍वराचे अधिष्ठान आहे. सत्यमेव जयते या वचनाप्रमाणे सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल, अशी आमची श्रद्धा आहे.

भारताला आतंकवादमुक्त करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हवे ! – श्री. गुरुप्रसाद, हिंदु जनजागृती समिती

भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदु धर्म आणि हिंदू यांची मुस्कटदाबी केली जात आहे. एकीकडे हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून भक्तांनी मंदिरात अर्पण केलेल्या निधीचा वापर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी केला जात आहे; तर दुसरीकडे इसिससारख्या जिहादी आतंकवादी संघटनांनी भारताला इस्लामी राष्ट्र बनण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे भारताला आतंकवादमुक्त करून देशात खर्‍या अर्थाने सुखाशांती नांदण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *