Menu Close

२०० महिलांवर बलात्कार, ५०० जणांची हत्या ही इसिसच्या आतंकवाद्यांसाठी सामान्य कृती !

इसिस हे सर्व अत्याचार इस्लाम धर्माच्या नावाने करत असतांना त्याचा साधा निषेधही करण्याचे धाडस भारतातील तथाकथित पुरोगाम्यांनी का दाखवले नाही ?

बगदाद (इराक) : इराकमधील किरकुक शहरावर ताबा मिळवण्यासाठी खुर्द सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर इसिसचे काही आतंकवादी युद्धबंदी म्हणून कह्यात घेण्यात आले. त्यांतील अमर हुसेन नावाच्या नराधमाशी ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने संवाद साधला. अमर हुसेन याने आतापर्यंत २०० याझिदी जमातीच्या आणि इतर अल्पसंख्यांक जातीच्या महिलांवर बलात्कार केले आणि सुमारे ५०० जणांची हत्या केली होती; मात्र या कृत्याबद्दल हुसेनच्या चेहर्‍यावर कुठल्याच प्रकारची खंत दिसून येत नव्हती. उलट त्याने ‘ही इसिसच्या सैनिकासाठी सामान्य कृती आहे’, असे सांगितले. (यावरून इसिसची विचारसरणी किती धोकादायक आहे हे स्पष्ट होते. भारताने आणि विशेषत: हिंदूंनी हा धोका ओळखून इसिसची आणि त्यांना समर्थन करणार्‍या संघटना आणि व्यक्ती यांची पाळेमुळे देशातून उखडून टाकणे अपेक्षित आहे ! – संपादक)

या वेळी हुसेन म्हणाला, ‘‘तो इसिसच्या सैन्याच्या ज्या पथकात कार्यरत होता त्या पथकाच्या वरिष्ठ अधिका-याने त्याला वाटेल तेवढ्या महिलांवर बलात्कार करण्याची मुभा दिली होती. ‘तरुण सैनिकाची ती एक आवश्यकता आहे’, असे त्यांचे मत होते. इसिसच्या सैन्याने जेव्हा इराकी गावांचा ताबा घेतला तेव्हा हुसेन हा घराघरांत फिरून पाहिजे त्या महिलेवर बलात्कार आणि त्याला वाटेल त्या व्यक्तीची हत्या करत असे. इसिसच्या आतंकवाद्यांनी याझिदी जमातीच्या वसाहतीवर आक्रमण करून अगणित याझिदी जातीच्या लोकांना ठार केले. त्यांच्या महिलांवर बलात्कार केले आणि त्यांना लैंगिक गुलाम म्हणून वागणूक देत त्यांची लिलावाद्वारे सार्वजनिक विक्री केली.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *