कोलकाता : बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. तपन घोष यांच्या हिंदु संहति या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथील राणी रासमणी रस्त्यावर भव्य सभेचे आयोजन केले होते. या सभेला सहस्रावधी हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदूऐक्याची चुणूक दाखवली. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्या ममता बनर्जी सरकारच्या राजवटीत हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. या सभेत भारत सेवाश्रम संघ, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी भाग घेतला होता.
गेल्या काही दिवसांत धर्मांधांनी धुलागढ, तेहत्ता, समुद्रगढ, कटवा, देगंगा, कान्निंग, उष्टी, पंचाला, धोला, इस्लामपूर, कालीयाचक, खाग्रगढ आदी ठिकाणी अनेक हिंदूंना ठार मारणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे आदी अत्याचार केले आहेत. एकूणच हे अत्याचार बंगाल राज्याची इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे द्योतक आहे, अशी टीका अनेकांनी केली. या सर्व घटनांचा ऊहापोह या सभेत करण्यात आला.
भाजपकडूनही सभेचे आयोजन
अशीच एक सभा भारतीय जनता पक्षाने १३ फेब्रुवारी या दिवशी हावडा जिल्ह्यातील खालीसनी कालीताला येथे आयोजित केली होती. या सभेलाही हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होेते. या सभेत भाजपचे राज्य अध्यक्ष दीलीप घोष यांनी बंगालमधील धर्मांधांच्या अत्याचारांच्या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित होण्याचे आवाहन केले.